बचतीला पर्याय नाही.
अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.
नियम, अटी आणि खाते उघडण्या करिता आवश्यक कागदपत्रे
| क्र. | नियम, अटी |
|---|---|
| १ | विविध प्रकारचे खाते उघडले जाऊ शकतात. अ] व्यक्तिगत/संयुक्त/18 वर्षावरील |
| २ | कमीत कमी रु. 300/- सुरवातीची शिल्लक घेऊन खाते उघडल्या जाईल. |
| ३ | संपर्क व सेवेसाठी पत्ता/टेलिफोन/मोबाईल/ई-मेल देणे व वेळोवेळी बदल झाल्यास संस्थेला कळविणे. |
| ४ | बचत खाते स्लीपवर भरणाऱ्याची सही करणे आवश्यक आहे. |
| ५ | पासबुक सांभाळून ठेवणे व संभावित धोका टाळण्यासाठी पासबुकवर सही करू नये |
| ६ | एकाच व्यक्तीच्या नावाने एकच बचत खाते (संयुक्तिक खाते वगळता) उघडला जाईल. |
| ७ | बचत खात्यावर व्याज आकारणी करताना रु. 1.00/- पेक्षा कमी व्याज खात्यात जमा करता येणार नाही. |
| ८ | बचत खात्याची पुस्तिका हरविल्यास पुन्हा रु. ३५/- देवून पुस्तिका तयार करून देता येईल. |
| ९ | रक्कम काढते वेळी स्वतः उपस्थित रहावे अन्यथा त्या रक्कमेची जबाबदारी त्या खातेदारावर राहील. |
| १० | नियमामध्ये बदल करण्याचे अधिकार संस्थेचे व्यवस्थापन मंडळाला राहील. |
| ११ | व्यवहार झाल्यानंतर खाताधारकानी पुस्तिका तपासून घ्यावी. |
| १२ | बचत खात्यात दोन वर्षापर्यंत व्यवहार सुरु नसल्यास ते खाते बंद करण्याचे अधिकार संस्थेचे राहील. |
| १३ | RTGS/NEFT द्वारे राशी अन्य बँकेच्या आपल्या द्वारे असलेल्या खात्यात हस्तांतरित करण्याची सेवा उपलब्ध आहे. |
| क्र. | खाते उघडण्या करिता आवश्यक कागदपत्रे |
|---|---|
| अ] | वैयक्तिक आणि HUF – |
| १ | आधार कार्ड |
| २ | पासपोर्ट / PAN कार्ड |
| ३ | विजेचे बिल/ पाण्याचे बिल/ टेलीफोनचे बिल (मागील ३ महिन्यातले) |
| ४ | गॅस कनेक्शन कार्ड (३ महिन्यापेक्षा जुने नको) |
| ५ | ३ passport size फोटो. |