आधुनिक बँकिंग सुविधा ज्या सुरक्षित आणि वेगवानही आहे.
अतूट बंधनाचे नाते म्हणजे. श्री. शुभलक्ष्मी क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.
 
        | क्र. | नियम व अटी | 
|---|---|
| १ | छापील अर्ज भरून त्यात असलेली संपूर्ण माहिती स्वहस्ताक्षरात सविस्तर भरावी. | 
| २ | सर्व. प्रकारचे ठेवीदार/खातेदार यांच्या कडून आपला ग्राहक ओळखा ची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. | 
| ३ | आधार कार्ड,पॅन कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, टेलीफोन बिल, दोन फोटो इत्यादी देऊन पूर्तता करून घेणे. | 
| ४ | पिग्मी खात्यात व मुदती ठेव खात्याची रक्कम रोखीने दिली जाणार नाही, ती चेक ने अथवा त्यांच्या खात्यांत जमा केली जाईल. | 
| ५ | खाते उघडतांना खातेदाराने संस्थेत येणे आवश्यक आहे. | 
| ६ | दैनिक बचत खात्याचे पासबुक दरमहा एकाच वेळेस एकाच दिवशी तपासणी करीत देणे आवश्यक आहे. (कर्ज व इतर पासबुक मिळून). | 
| ७ | खात्यात व्यवहार हा नियमित करावा. अनियमित खाते बंद करण्याचा अधिकार संस्थेला राहील. | 
| क्र. | नियम व अटी | 
|---|---|
| ८ | दैनिक बचत खात्याची मुदत एक वर्षाची राहील. | 
| ९ | दैनिक बचत खात्याच्या जमा रकमेवर ८०% कर्ज दिले जाईल. | 
| १० | विड्रॉल चे पैसे स्वतः घेऊन जाणे एजेंट किंवा इतरामार्फत नेल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. | 
| ११ | बचत खाते कमीत कमी रु. ३००/- किंवा त्या पेक्षा जास्त रकमेने उघडता येईल. खाते चालू ठेवण्याकरीता रु. ३००/- नेहमी करीत खात्यात जमा ठेवावे लागेल. | 
| १२ | एका व्यक्तीकडून एका दिवसाला २ लाख व त्यापेक्षा अधिक राशी नगदीने स्वीकाण्यात येणार नाही. राशी स्वीकारल्यास कलम २७१ दि. ए. नुसार तेवढ्याच रकमेचा दंड सोसावा लागेल तसेच राशी नागडीने दिल्यास हाच नियम लागू राहील. | 
| १३ | सभासदाकडूनच ठेवी स्वीकारल्या जातील, सभासद नसल्यास सभासद करून घेणे आवश्य आहे. (कलम १४४-५). | 
| १४ | खाते उघडताना पॅन कार्ड आवश्य आहे. पॅन कार्ड नसल्यास फॉर्म नं. ६० भरून घ्यावा लागेल. |